Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा.
Free Flour Mill Scheme : नमस्कार! महिलांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद (ZP) मार्फत आता पात्र महिलांना १००% अनुदानावर मोफत पिठाची गिरणी (चक्की) आणि शालेय विद्यार्थिनींना सायकल देण्याची योजना सुरू झाली आहे. ही योजना नेमकी कोणत्या महिलांसाठी आहे, अर्ज करण्याची पद्धत काय आहे आणि तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू झाले आहेत की नाही, हे कसे तपासावे, याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
तुमच्या जिल्ह्यात योजना सुरू झाली आहे की नाही, कसे तपासावे?
सध्या ही योजना बुलढाणा जिल्हा परिषदेने जाहीर केली आहे. जरी तुमच्या जिल्ह्यात लगेच अर्ज सुरू झाले नसले तरी, इतर जिल्ह्यांमध्येही लवकरच ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे.
तुमच्या जिल्ह्यात ही योजना सुरू झाली आहे की नाही हे तपासण्याची सोपी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
गुगल सर्च करा: सर्वप्रथम गुगलवर तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि त्यापुढे “झेडपी (ZP) [तुमच्या जिल्ह्याचे नाव]” (उदा. ZP पुणे किंवा ZP नाशिक) असे टाईप करून सर्च करा.
अधिकृत वेबसाईट: सर्च रिझल्टमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर (उदा. zp[जिल्हा].maharashtra.gov.in) क्लिक करा.
सूचना/जाहिरात तपासा: वेबसाईटवर गेल्यानंतर, ‘सूचना’, ‘जाहिराती’, किंवा ‘बातमीपत्र’ (Notifications/Advertisements) या पर्यायांवर क्लिक करा.
मोफत पिठाची गिरणी (चक्की) योजनेसाठी पात्रता आणि अटी
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या जाहिरातीनुसार, दिव्यांग महिला/मुलींसाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
योजनेचे स्वरूप: पिठाची चक्की खरेदीसाठी पुरवणे (DBT – Direct Benefit Transfer द्वारे लाभ).
लाभार्थी: दिव्यांग महिला किंवा दिव्यांग मुली.
वय मर्यादा: अर्जदाराचे वय १८ ते ४५ वर्षांदरम्यान असावे.
उत्पन्न मर्यादा: अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१,२०,००० (एक लाख वीस हजार) पेक्षा कमी असावे.
रहिवासी: अर्जदार ग्रामीण भागातील आणि त्याच जिल्ह्यातील रहिवासी असावा.
मागील लाभ: मागील पाच वर्षांमध्ये कोणत्याही जिल्हा परिषद योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे साधारणपणे आवश्यक असतील:
आधार कार्ड (Aadhaar Card).
अपंगत्वाचे प्रमाणपत्र (अपंग महिलांसाठी अनिवार्य).
उत्पन्नाचा दाखला (पतीच्या किंवा स्वतःच्या नावाचा) – तहसीलदार यांनी दिलेला.
रहिवासी दाखला (Domicile Certificate).
राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची प्रत (IFSC कोड आणि खाते क्रमांक स्पष्ट दिसावा).
अर्ज भरण्याची आणि जमा करण्याची प्रक्रिया
पिठाच्या गिरणीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.
अर्ज डाउनलोड करा: जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरून (किंवा जाहिरातीत दिलेल्या लिंकवरून) अर्ज डाउनलोड करा.
माहिती भरा: अर्जामध्ये विचारलेली मूलभूत वैयक्तिक माहिती भरा:
सही व स्वाक्षरी: अर्जदाराची सही (महिलेची) आणि पालकाची सही (आवश्यक असल्यास) करा.
डॉक्युमेंट्स जोडा: सर्व आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, उत्पन्न दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र इ.) अर्जासोबत जोडा.
अर्ज जमा करा: भरलेला अर्ज आणि सर्व कागदपत्रे तुमच्या जिल्हा परिषदेच्या तालुका पातळीवरील महिला व बालकल्याण विभाग कार्यालयात किंवा मुख्य जिल्हा परिषद कार्यालयात जमा करा.
पडताळणी: अर्ज जमा केल्यानंतर, बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा संबंधित विस्तार अधिकारी यांच्याकडून तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करून घ्या.