राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज : पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या (६ डिसेंबर २०२५) राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा यासह सर्वच भागांत ढगाळ वातावरण राहील. हे ढगाळ वातावरण केवळ आजचा दिवस (६ डिसेंबर) आणि उद्या दुपारपर्यंत (७ डिसेंबर) कायम राहील. या काळात दिवसा देखील धुकं (धुई) राहील, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, सर्व शेतकऱ्यांनी एक बाब लक्षात घ्यावी की, हे ढगाळ वातावरण असले तरी राज्यात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सध्या पाऊस येईल या भीतीने कोणतेही काम थांबवण्याची गरज नाही.
थंडीची लाट आणि तापमानातील बदल राज्यातील ढगाळ वातावरण उद्या (७ डिसेंबर) दुपारनंतर निवळेल आणि याच दिवशी म्हणजेच ७ डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात होईल. ही थंडीची लाट जवळपास २० डिसेंबरपर्यंत वाढतच जाणार आहे. या काळात उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे दिवसा देखील चांगला थंड झिलावा (गारवा) जाणवेल.
















