पिएम किसान योजनेतून हजारो शेतकरी झाले अपात्र; हे मुख्य कारण!
पीएम-किसान सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. केवळ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातच २०,००० हून अधिक शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
मुख्य कारण: आधार कार्ड लिंक नसणे, ई-केवायसी पूर्ण न करणे, मोबाईल नंबर निष्क्रिय असणे आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे, यामुळे अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित झाले आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी आपले ई-केवायसी पूर्ण केले नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिलेला इशारा:
“जमीन नोंदणी व कुटुंब पडताळणी संबंधित ही सर्वाधिक सामान्य कारणे आहेत. ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळावा यासाठी तत्काळ त्यांनी दुय्यम/तृतीय स्तरावरील ई-केवायसी, आधार नोंदणी व बँक खात्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.”
त्वरित करा हे काम:
आपण पात्र लाभार्थी आहात याची खात्री करण्यासाठी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे आणि आपले ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झाले आहे की नाही, हे तपासा.