Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज
Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज
Read More
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
Read More
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२५: मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऑनलाइन आवेदन की पूरी प्रक्रिया
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२५: मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऑनलाइन आवेदन की पूरी प्रक्रिया
Read More
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Read More
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
Read More

धाराशिवमधील पिकविम्याचे २२० कोटी रुपये अखेर मिळणार!

२०२० च्या खरीप विम्याचा मार्ग सुकर

सन २०२० मधील खरीप हंगामातील पीक विम्याच्या भरपाईसाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन लढाईला अखेर यश आले आहे. प्रलंबित पीक विमा भरपाई वाटपाचा मार्ग यामुळे सुकर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने पीक विमा कंपनीच्या विरोधात निकाल दिला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० च्या पीक विमा भरपाईपोटी आणखी २२० कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ADS किंमत पहा ×

अतिवृष्टीनंतर विमा कंपनीची टाळाटाळ

सन २०२० मधील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे काढणी पश्चात मोठे नुकसान झाले होते. मात्र, बजाज अलायन्स या खासगी पीक विमा कंपनीने न पटणारी तांत्रिक कारणे देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. याविरोधात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आपल्या हक्कासाठी लढा दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापूर्वी खरीप हंगाम २०२० मधील नुकसानीपोटी विमा कंपनीच्या माध्यमातून २८९ कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर जवळपास २२० कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असतानाही विमा कंपनीकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात होती.

Leave a Comment